तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डुक्करवाडी विद्यालयाचा प्रथम क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2019

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डुक्करवाडी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. 
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यातील बागीलगे डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेज या प्रशालेचा तालुकास्तरीय विज्ञान  प्रदर्शनात इयत्ता  नववी ते बारावी या गटात विद्यार्थी शैक्षणिक साधन या कृतीमध्ये औषध फवारणी व कोळपणी नांगर या उपकरणाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे .या त्यांच्या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. या विद्यालयाच्या वतीने राज रत्नहार पाटील व श्रेयस सुहास गावडे या दोन विद्यार्थ्यांनी या उपकरणाची माहिती देत  या उपकरणाने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम यांची बचत कशी होते याची माहिती विशद केली .या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. कांबळे, विज्ञान शिक्षक पी . एन .गावडे यांचे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment