चंदगड नगरपंचायतीसाठी आज एक व आतापर्यंत सहा अर्ज दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी आज एक व आतापर्यंत सहा अर्ज दाखल


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचातीसाठी आज अर्ज भरण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी एक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे आतापर्यंत 5 व्यक्तींनी सहा अर्ज दाखल केले आहेत. आज सलग चौथ्या दिवशीही नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज अद्याप आला नसल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली. 
आज दिवसभरात केवळ फिरोज अब्दुलरशीद मुल्ला यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगरपंचायतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने भरायचे असल्याने या प्रक्रीयेमध्ये बराचशा वेळ जात आहे. उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करत करण्यात गुंतले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यापुढील दिवसामध्ये झुंबड उडणार आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी पॅनेलमधूनच उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविणार असल्याने बंडखोरांचे मोठे आव्हान असणार आहे. 

No comments:

Post a Comment