![]() |
मधमाशीचे संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री / प्रतिनिधी
मधमाशांच्या तुफानी हल्ल्यात कागणी (ता. चंदगड) येथील सयाजी आण्णासो देसाई (वय -६०) व वाकोबा हरिबा आपटेकर (वय -५०) हे गंभीर जखमी झाले. आज शनिवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान हि घटना घडली.
सयाजी व वाकोबा दोघे भात शेतीत साठलेले पाणी काढण्यासाठी `मडवळकी` नावाच्या शेतात सकाळी सात वाजता गेले होते. अचानक दोघांवर कोणगे मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशांनी तुफानी हल्ला चढवला. त्यांचा जिवाच्या आकांताने होणारा आरडाओरडा ऐकून गावातील लोक मदतीला धावले. मधमाशांनी लपेटलेल्या दोघांना बेळगाव रस्त्यावरील कालकुंद्री फाट्यावर आणून मोठा धूर केला व मधमाशा काढून टाकल्या. त्यानंतर दोघांना तातडीने कोवाड येथील खाजगी रुग्णांलयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचे ब्लडप्रेशर तीनशेच्या वर गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसंगावधान राखून दोघांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन देसाई, प्रकाश भोगण, महादेव बाचुळकर, वसंत भोगण, आप्पा कुदनूरकर आदी ग्रामस्थांसह अनेक महिलांनी सहकार्य केले. दोघांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावरील धोका टळला आहे.
No comments:
Post a Comment