चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील गुडेवाडी व वाघोत्रे या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ डिसेंबर 2019 रोजी मतदान होत आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यानी दिली.
गुडेवाडी येथील सदस्यांच्या ९ व सरपंचासाठी १ अशा १० जागा साठी मतदान होत आहे. या दहा जागासाठी २० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीत स्थानिक नेते मंडळीनी आपल्या सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्या सत्ताधारी नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सातेरी ग्रामविकास आघाडीतून सरपंच महादेव विठ्ठल पाटील हे सरपंच पदासाठी तर परशराम पांडूरंग कोकीतकर, सटूप्पा तुकाराम नाईक, योगिता यूवराज नाईक, रेश्मा निगोंजी पाटील, परशराम तुकाराम पाटील, महादेव मारूती पाटील, शांता अर्जून पाटील, सुगंधा विठ्ठल नाईक, तूळसा नाईक तर विरोधी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जय हनुमान ग्रामविकास महाआघाडीतून सरपंच पदासाठी नारायण बाबाजी आवडण व सदस्य पदासाठी प्रल्हाद परसू गावडे,छाया मायाप्पा पाटील,समृद्धी संभाजी पाटील, शिवराम शंकर नाईक,संभाजी म्हातारू पाटील, रेणुका जयवंत नाईक, गायत्री गजानन पाटील, नामदेव गोविंद पाटील, गंगूबाई तुकाराम नाईक हे उमेदवार निवडणुक लढवत आहेत. या निवडणुकीत ७५० पुरूष व ६९३ स्त्री मतदार असे एकूण १४४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
वाघोत्रे येथे फक्त सरपंचपदासाठी निवडणुक लागली आहे. उर्वरीत अजय महादेव कातकर, विठ्ठल पून्नाप्पा नाईक, प्रजक्ता यल्लाप्पा कांबळे, मोहन विजय गावडे,दिपाली दिपक गावडे, लतिका गणपत गावडे या सहा उमेदवारांचेच अर्ज आल्याने हे सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. सरपंचपदाठी संतोष मारूती गावडे व सागर मनोहर गावडे या दोन उमेदवारामध्थे सरपंचपदाठी थेट लढत होत आहे. १३३ महिला तर १२७ असे एकूण २६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतमोजणी तहसिल कार्यालयातील सभागृहात सोमवार ९ रोजी सकाळी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डी. एम. नांगरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment