![]() |
किणी येथे मनसेच्या वतीने पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर. |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विर्लेपार्लेचे शाखाअध्यक्ष समीर काळे व मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्याकडून चंदगड तालुक्यातील किणी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यापूर्वी कालकुंद्री, राजगोळी, दुंडगे व किणी या गावांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. मात्र काही अडचणीमुळे किणी येथे शैक्षणिक साहित्य वाटायचे राहिले होते. त्यामुळे किणी माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा येथील 250 विद्यार्थ्यांसाठी साहित्य आले होते. ते सर्व साहित्य ग्रामपंचायत किणी मधे जमा होते. त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्वशील पाटील, उपतालुकाध्यक्ष अमर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नितेश नाईक यांच्यासह किणीचे उपसरपंच परशराम हुंदळेवाडीकर व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment