गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी विक्रमी 91.2 तर वाघोत्रेसाठी 69.62 टक्के मतदान शांततेत - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2019

गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी विक्रमी 91.2 तर वाघोत्रेसाठी 69.62 टक्के मतदान शांततेत


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील गुडेवाडी व वाघोत्रे या ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले. गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी आज झालेल्या मतदानाच्या दिवशी विक्रमी 91.2 तर वाघोत्रे ग्रामपंचायतीसाठी 69.62 टक्के मतदान झाले. उद्या सकाळी दहा वाजता तहसिल कार्यालयात दोन टेबलवर मतमोजणी होणार असून एक तासामध्ये निकाल हाती येईल अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डी. एम. नांगरे यांनी दिली. 
आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सकाळ काहीसा संथ तर दुपारी मतदान केंद्रावर गर्दी पहायला मिळाली. गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी 693 स्त्रिया व 750 पुरुष असे एकूण 1443 मतदार आहे. त्यापैकी आज 641 स्त्रियांनी तर 675 पुरुषांनी असे 1316 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 91.2 टक्के विक्रमी मतदान झाले. वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 133 स्त्रिया व 127 पुरुष असे एकूण 260 मतदार होते. त्यापैकी 98 स्त्रियांनी व 83 पुरुषांनी अशी 181 मतदारांनी 69.62 टक्के मतदान झाले. 
गुडेवाडी येथे सदस्यपदासाठी एक व सदस्यासाठी 9 जागासाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. स्थानिक सातेरी ग्रामविकास आघाडी व जय हनुमान ग्रामविकास आघाडी या दोघांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. 
वाघोत्रे येथे फक्त सरपंचपदाठी निवडणुक लागली आहे. सरपंचपदाठी संतोष मारूती गावडे व सागर मनोहर गावडे या दोन उमेदवारांमध्ये सरपंचपदाठी थेट लढत होत आहे. उर्वरीत अजय महादेव कातकर, विठ्ठल पून्नाप्पा नाईक, प्राजक्ता यल्लाप्पा कांबळे,  मोहन विजय गावडे, दिपाली दिपक गावडे, लतिका गणपत गावडे या सहा उमेदवारांचेच अर्ज आल्याने हे सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. 


No comments:

Post a Comment