कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे यांच्या आश्वासनानंतर रोहित मलमे यांचे उपोषण मागे - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2019

कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे यांच्या आश्वासनानंतर रोहित मलमे यांचे उपोषण मागे

शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलावे यासाठी केलेले उपोषण सोडविताना खासदार संभाजीराजे छत्रपती.
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्राची  अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये असणारे सध्याचे "शिवाजी विद्यापीठ"या विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा. या मागणीसाठी  "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ" असा नामविस्तार व्हावा या मागणीसाठी छत्रपती ग्रुपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी  आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी छत्रपती ग्रुप सदस्य संतोष कांबळे हे हि  उपोषणास बसले होते.  खासदार संभाजीराजे यांच्या आश्वासनानंतर रोहित मलमे यांचे उपोषण मागे घेतले. 
6 डिसेंबर 2019 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणास सुरुवात झाली होती. अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी यावेळी आपला पाठींबा दर्शविला.आज दिनांक 7रोजी  सकाळी ठीक 12:40 वाजता कोल्हापूर चे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्या उपोषणास भेट देऊन आपण हा मुद्दा उपस्थित केला आहे. आता आपण हि लढाई सरकार मार्फत लढून आपली मागणी शासन पातळीवर मान्य करुण घेऊया असे आश्वासन देऊन उपोषण माघे घेण्याची विंनती केल्याने छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते उपोषणास स्थागिती देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांनी सांगितलं तरीही राज्य भरातील शिवरायांच्या नावे असणाऱ्या एकेरी उल्लेखाच्या पाट्या, बोर्ड, बॅनर बदलण्यासाठी हि मोहीम राज्यभर सुरु ठेवणार असल्याची माहिती मलमे यांनी दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख अनुप घाटगे सरकार. राज्याभिषेक समिती अध्यक्ष फतेसिंह सावंत (सरकार). उदय फाळके.योगेश अमर पाटील. युवराज उलपे. संजय पवार  स्वप्नील बारले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने उपजिल्हा अध्यक्ष.  संजयसिंह  जाधव. अजय हराळे यांच्यासह असंख्य मान्यवर व विद्यापीठ प्रशासन उपस्थित होते.


No comments:

Post a Comment