चंदगड नगरपंचायतीसाठी 10 डिसेंबरला भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी 10 डिसेंबरला भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

चंदगड येथे आयोजित भाजपच्या बैठकीत हाळवणकर यांची माहीती
चंदगड नगरपंचायत निवडणुकीबाबत भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, गोपाळराव पाटील व भरमू पाटील आदी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी चंदगडकरांनी एकजुटीने नगरपंचायत मंजूर करा, निवडणुकीसाठी आम्ही कोणीही अर्ज भरणार नसल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष नगरपंचायत निवडणुक लागल्यानंतर असे झाले असते तर आम्ही नगरपंचायत निवडणुक बिनिवरोध केली असती. नगरपंचातीसाठी ज्याप्रमाणे चंदगडकरांनी एकजूट दाखवली. त्याचप्रमाणे निवडणुक बिनविरोध करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती. मात्र आता जे राजकारण चाललेला आहे ते पाहता स्वतः काहीही न करता आयत्या पिठावर रांगोळी काढणारे लोक तयार झाल्याचे दिसते. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. चंदगड येथील भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
भाजपकडून चंदगड नगरपंचायतीची निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. नगरपंचायतीच्या सतरा वार्डातून प्रत्येकी चार असे 68 अर्ज आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आट अर्ज आले आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सुचना करतील, त्याप्रमाणे 10 डिसेंबर 2019 रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक निवड केली जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विश्वासाने चंदगडकरांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत नगरपंचायतीचा अध्यादेश काढला. त्यांनी दाखविलेला विश्वासाचा पैरा फेडण्याची आज वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी हिंदुराव शेळके, बाबा देसाई, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, भरमूआण्णा पाटील, नामदेव पाटील, सुनिल काणेकर, सचिन बल्लाळ, बाबु रामा हळदणकर, ॲड. विजय कडुकर, सचिन पिळणकर, सुधीर देशपांडे, श्रीशैल नागराळ, चंद्रकांत दाणी, देवदास पाटील, सचिन नेसरीकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment