चंदगड येथील कमल कोरे यांची पहिल्या दिव्यांग महिला क्रिकेट संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2019

चंदगड येथील कमल कोरे यांची पहिल्या दिव्यांग महिला क्रिकेट संघात निवड

कमल कोरे
चंदगड / प्रतिनिधी
देशातील पहिल्या दिव्यांग महिला क्रिकेट संघात चंदगड येथील  सौ. कमला अनिल कोरे यांची बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या क्रिकेट सामन्यासाठी निवड झाली आहे.
बडोदा येथे सर्व निवड झालेल्या क्रिकेट खेळाडूंचे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्यामध्ये कमल कोरे यांचा सहभाग होता. येत्या 2020 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारताचा हा संघ पहिला क्रिकेट सामना खेळणार आहे. या सामन्यात चंदगड येथील दिव्यांग महिला सौ. कमल कोरे यांची निवड झाली आहे. बडोदा येथे झालेल्या शिबिरामध्ये दिव्यांग कंट्रोल इंडिया व बडोदा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यामध्ये सर्व खेळाडूंनी सरावा दरम्यान मार्गदर्शन  करण्यात आले. या शिबिरात खेळाडूंना नितेंद्रसिंह व हसन रशिद यांनी मार्गदर्शन केले. कमल कोरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment