चंदगड नगरपंचायतीसाठी आज दहा, आतापर्यंत पंधरा, नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी आज दहा, आतापर्यंत पंधरा, नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचातीसाठी आज अर्ज भरण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी आठ उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत 15 अर्ज दाखल झाले आहेत. आज सलग सहाव्या दिवशीही नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज अद्याप आला नसल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली. 
अभिजित शांताराम गुरबे यांनी प्रभाग क्रमांक एकमधून दोन तर प्रदिप लक्ष्मण कडते यांनी एक अर्ज दाखल केला आहे. चेतन व्यकटेश शेरेगार यांनी प्रभाग क्रमांक दोनमधून एक अर्ज, मेहताब आयुब नाईक यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून एक अर्ज, आनंद मारुती हळदणकर यांनी प्रभाग क्रमांक आठमधून एक अर्ज, अनुसया श्रीकृष्ण दाणी यांनी प्रभाग क्रमांक नऊमधून एक अर्ज, अनिता संतोष परीट यांनी प्रभाग क्रमांक दहामधून एक अर्ज, संजीवनी संजय चंदगडकर यांनी प्रभाग क्रमांक पंधरामधून दोन अर्ज असे आज दिवसभरात आठ उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले आहेत. 
नगराध्यक्ष पद आपल्याकडे ठेवण्यासाठी शहरातील नेतेमंडळीच्यामध्ये चढाओढ दिसून येत आहे. त्यादृष्टीने व्युव्हरचना करण्याचे नियोजन सुरु आहे. नगराध्यक्षपदासाठी लवकर अर्ज भरला तर बंडखोरीला सामोरे जावे लागेल. यासाठी सावध पवित्रा घेत बैठकावर-बैठका घेवून आपलाचा उमेदवार कसा योग्य आहे. याविषयी फिल्डींग लागली जात आहे. काल झालेल्या भाजच्या बैठकीत भाजप स्वतंत्र नगरपंचायतीची निवडणुक लढविणार असून सर्व स्वतंत्र पॅनेल उभे करणार आहे. यासाठी 12 डिसेंबरला मुलाखती होवून निवड झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला जाणार आहे. आतापर्यंत मराठा समाजाला डावलले जात असल्याच्या भावनेतून मराठा समाज एकवटला असून त्यांनीही निवडणुक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. याबाबत अंतिम निर्णय घेवून पुढील दिशा ठरविली जाणार आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्या उमेदवार निवडीसाठी बैठकांचे खलबत्ते सुरु आहे. आघाडीबाबत एकमत झाल्यानंतरच नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याला शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने या तीन दिवसामध्ये नाट्यमय घडामोडी होणार आहेत. 

No comments:

Post a Comment