चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महाआघाडीच्या मंत्रीमंडळात शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व विधान परिषदेचे अलिबागचे आमदार जयंत पाटील यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शेकापचे सहचिटणीस रविंद्र पाटील यांनी महाआघाडीकडे केली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी महाआघाडी झाल्यानंतर महाराष्ट्रात शेकापच्या कार्यकर्त्यांनी राष्टीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य केले आहे. आमदार जयंत पाटील ज्येष्ठ आमदार आहेत. गेली सहा वेळा ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासाठी शेकापने केलेले कष्ट विचारात घेऊन शेकापचे राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment