![]() |
चंदगड येथे गुडेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील गुडेवाडी व वाघोत्रे या ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झाले आहे. आज येथील तहसिल कार्यालयात दोन टेबलवर मतमोजणी झाली. गुडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीमध्ये सरपंचपदी महादेव विठ्ठल पाटील हे निवडून आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सातेरी ग्रामविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष मारुती गावडे हे निवडून आले आहेत. तासाभरात निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर गुडेवाडी येथील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. खरात यांनी तर वाघोत्रे येथे ए. पी. जिर्नाळे यांनी काम पाहिले.
गुडेवाडी ग्रामपंचायतीसाठी सदस्यांच्या नऊ व सरपंचासाठी एक अशा दहा जागांसाठी निवडणुक लागली होती. या दहा जागा साठी वीस उमेदवार निवडणुक रिंगणात होते. या निवडणुकीत स्थानिक नेते मंडळीनी आपल्या सोयीनुसार आघाड्या केल्या होत्या. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, गोपाळराव पाटील, अप्पी उर्फ विनायक पाटील या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाडी केली होती. स्थानिक सातेरी ग्रामविकास आघाडी व जय हनुमान ग्रामविकास महाआघाडीमध्ये थेट लढत झाली. यामध्ये सातेरी ग्रामविकास आघाडीने बाजी मारली.
यामध्ये सरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. महादेव पाटील, नारायण बाबाजी आवडण व रामचंद्र गुंडू पाटील या तिघांच्यामध्ये महादेव पाटील यांनी बाजी मारत 657 मते घेवून सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार कंसात मते – प्रभाग क्रमांक एकमधून छाया मायाप्पा आवडण (243), शांता अर्जून पाटील (233), परशराम पांडुरंग कोकीतकर (260). प्रभाग क्रमांक दोन मध्ये सटुप्पा तुकाराम नाईक (217), रेणुका जयवंत नाईक (232), संभाजी म्हातारु पाटील (214). प्रभाग क्रमांक तीन मध्ये तुळसा सिताराम नाईक (264), योगिता युवराज पाटील (245) व नामदेव गोविंद पाटील (254).
वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या आठ जागापैकी सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार नसल्याने हि जागा रिक्त आहे. त्यामुळे वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या केवळ सरपंच पदासाठी निवडणुक लागली होती. यामध्ये संतोष गावडे यांना 104 तर सागर मनोहर गावडे यांना 75 मते पडल्याने संतोष गावडे हे 29 मतांनी विजयी झाले. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे – अजय महादेव कातकर (सर्वसाधारण), विठ्ठल पुन्नाप्पा नाईक (ना. मा. प्रवर्ग), प्राजक्ता यल्लाप्पा कांबळे (सर्वसाधारण स्त्री), मोहन विजय गावडे (सर्वसाधारण), दिपाली दिपक गावडे (सर्वसाधारण स्त्री), लतिका गणपती गावडे (सर्वसाधारण स्त्री).
No comments:
Post a Comment