श्रमजीवी वर्गाने आपले हक्क जाणून घ्यावेत - प्रा. दीपक पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2019

श्रमजीवी वर्गाने आपले हक्क जाणून घ्यावेत - प्रा. दीपक पाटील

कोवाड महाविद्यालयाच्या वतीने मानवी हक्क दिनि स्वच्छता साहित्य वाटप
मानवी हक्क दिनानिमित्त कोवाड महाविद्यालयाच्या वतीने श्रमजीवी कुटुंबांना स्वच्छता साहित्य वाटप करताना प्रा दीपक पाटील, सोबत प्राचार्य एस एम पाटील आदी मान्यवर, विद्यार्थी व कष्टकरी कुटुंबे.
कालकुंद्री / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील श्रमजीवी वर्गाने आपले हक्क जाणून घ्यावेत. शासन व समाजाने त्यांच्या श्रमाची जाणीव ठेवून त्यांची प्रतिष्ठा जपावी. असे प्रतिपादन कोवाड महाविद्यालयाचे प्रा.  राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक पाटील यांनी केले ते मानवी हक्क दिनानिमित्त होसूर येथे श्रमजीवी वर्गाला स्वच्छता साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.
मानवी हक्क दिनानिमित्त कोवाड येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने होसुर ता.चंदगड तेथे रस्ता काम करणाऱ्या पन्नास कुटुंबांना साबण, टूथपेस्ट, टुथब्रश, कंगवा, तेल आदी स्वच्छता साहित्य संच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील  यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कॉलेज विद्यार्थी विद्यार्थ्यीनिंनी श्रमजीवी वर्गाच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. प्राचार्य पाटील यांनी देशाच्या प्रगतीचा पाया हा श्रमजीवी वर्गाच्या परिश्रमावरच अवलंबून असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी मोहन घोळसे, अजित होण्याळकर यांच्यासह विद्यार्थी सुप्रिया पाटील, पूजा नंदनवाडकर, भाग्यश्री पाटील, नम्रता देसाई, स्नेहल देसाई, प्रिया इंगवले, पल्लवी पुजारी, भैरवनाथ बुवा, पाटील, विनायक कांबळे आदींची उपस्थिती होती. रस्ता काम करणारी श्रमजीवी कुटुंबे महाविद्यालयाच्या सामाजिक उपक्रमामुळे भारावून गेले.

No comments:

Post a Comment