चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या सातव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी वैष्णवी आनंद हळदणकर आतापर्यंत एकमेव अर्ज दाखल झाला आहे. आज दिवसभरात सदस्यासाठी 17 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 17 जागासाठी आतापर्यंत 39 अर्ज दाखल झाले आहेत. सुधीर पिळणकर, शाहिदा नेसरीकर, शागुप्ता फनीबंद, महमदशफी मुल्ला व सचिन नेसरीकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याला केवळ दोनच दिवस उरल्याने बुधवारी व गुरुवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.
आज दिवसभरात दाखल झालेले अर्ज - प्रभाग क्रमांक एकमधून श्रीकृष्ण निलकंठ दाणी यांनी प्रभाग क्रमांक एकमधून एक, प्रभाग क्रमांक दोनमधून राजू दत्तात्रय चंदगडकर, राजू दत्तात्रय चंदगडकर, खालीद मोहमद पटेल, शंकर रामचंद्र देशमुख यांनी प्रत्येकी एक तर सुधीर रामचंद्र पिळणकर यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये शाहिदा शकील नेसरीकर यांनी दोन अर्ज भरले आहेत. प्रभाग क्रमांक चारमध्ये शागुप्ता तजमुल फनिबंद यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधून महमदशफी युसुफ मुल्ला यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक सहामधून इस्माईल महमंद शहा यांनी एक अर्ज, प्रभाग क्रमांक आठमध्ये भिमसेन लक्ष्मण राजहंस यानी एक अर्ज, प्रभाग क्रमांक नऊमध्ये अनुसया निलकंठ दानी व जयश्री परशराम फाटक यांनी प्रत्येकी एक अर्ज, प्रभाग क्रमांक अकरामध्ये सचिन निंगाप्पा नेसरीकर यांनी दोन अर्ज, प्रभाग क्रमांक बारामधून फिरोज अ रशिद मुल्ला यांनी एक अर्ज, प्रभाग क्रमांक चौदा मधून सुधीर दत्तात्रय देशपांडे, रोहीत राजेंद्र वाटंगी व गोविंद मनोहर गुरव यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment