कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2019

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर


कोल्हापुर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले.गडहिंग्लज अनुसूचित जाती महिला, चंदगड अनुसूचित जाती, राधानगरी आणि गगनबावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शाहूवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरोळ-भुदरगड-करवीर आणि पन्हाळा सर्वसाधारण महिलांसाठी तर हातकणंगले-कागल आणि आजरा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.उपजिल्हाधिकारी महसूल यांनी श्रावण क्षीरसागर यांनी सुरूवातील सर्वांचे स्वागत करून सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील 12 तालुक्यांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 यापैकी 1 महिलेसाठी आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 3 पैकी 2 महिलांसाठी तर सर्वसाधारणसाठी एकूण 7 पैकी 4 महिलांसाठी आरक्षण असणार आहे. या आरक्षण निश्चितीसाठी 1995 ते 2017 या कालावधीतील यापूर्वी पडलेल्या आरक्षणाचा विचार यावेळी करण्यात आला.लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने तालुके विचारात घेवून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये गडहिंग्लज 10.09 टक्के आणि चंदगड 8.88 टक्के या पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी निश्चित झाल्या. अनुसूचित जाती महिला आरक्षण काढताना चंदगड तालुक्यात सन 1999 साली अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने 2019 साठी गडहिंग्लज तालुक्याला अनुसूचित जाती महिला आरक्षण थेट निश्चित झाले आणि उरलेल्या चंदगड तालुक्यास अनुसूचित जाती आरक्षण झाले.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणासाठी गडहिंग्लज व चंदगड हे 2 तालुके वगळून ज्या तालुक्यांचे आरक्षण तीनवेळा पडलेले आहे ते वगळण्यात आले. ज्या तालुक्यांचे आरक्षण कमीत-कमी दोनवेळा पडलेले आहे असे शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा या तालुक्यांना निश्चित करण्यात आले.
यामध्ये 2012 मध्ये शाहूवाडी तालुक्यात महिला आरक्षण होते. त्यामुळे 2019 साठी शाहूवाडी तालुक्यास नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित झाले. उर्वरित राधानगरी व गगनबावडा हे तालुके नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी गडहिंग्लज-चंदगड-राधानगरी-गगनबावडा-शाहूवाडी हे तालुके वगळण्यात आले. उर्वरित शिरोळ-करवीर-कागल-पन्हाळा-हातकणंगले-भुदरगड व आजरा या 7 पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. यामधील हातकणंगले तालुक्यास तीनवेळा सर्वसाधारण महिला आरक्षण आले असल्यामुळे या तालुक्यास वगळण्यास आले. उर्वरित कागल व आजरा तालुक्यास 2017 साठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे चक्राकारप्रमाणे आरक्षण द्यायचे असल्यामुळे हे दोन्ही तालुके सर्वसाधारण महिला आरक्षणातून वगळण्यात आले. सर्वसाधारण महिला या पदाकरिता उर्वरित शिरोळ-भुदरगड-करवीर आणि पन्हाळा हे तालुके सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले. त्यामुळे हातकणंगले कागल व आजरा हे तालुके सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले.
तहसिलदार अर्चना कापसे, दीपक पाटील, संजय जाधव, विद्याधर गुरबे, केराप्पा हासूरी, रूपाली कांबळे, श्रीया कोणेकरी, इंदूताई नाईक, सुभाष देसाई, वकील अनंत कांबळे, राजगोंडा पाटील, मनिषा शिवणगेकर, राजवर्धन मोहिते, जालिंदर नांगरे, सरदार पाटील, रमेश कांबळे, महादेव कांबळे, स्वरूप पाटील, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment