बेळगाव येथे गुडघेदुखीवर व्याख्यान व मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2019

बेळगाव येथे गुडघेदुखीवर व्याख्यान व मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन

डॉ. नरेंद्र वैद्य
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव-पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी उपचार आणि रोबोच्या साहाय्याने गुडघे रोपण या विषयावर व्याख्यान आणि मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे शुक्रवार १३ डिसेंबर 2019 रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज), कोनवाळ गल्ली येथे मार्गदर्शन करणार आहेत.
गुडघेदुखी,सांधेदुखी,त्यांची मूळ कारणे, ते टाळण्याचे उपाय ,अत्याधुनिक शास्त्रीय उपाय याची माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना समजावून सांगणार आहेत.व्याख्याना नंतर अकरा ते पाच या वेळेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करून सल्ला देणार आहेत. डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.लोकमान्य थेट संवाद असा कार्यक्रम विविध गावात आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी विषयी मार्गदर्शन करणे, अत्याधुनिक उपचाराची माहिती दिली जात आहे. व्याख्याना नंतर सकाळी अकरा ते पाच या वेळेत लोकमान्य हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर रुग्णाची मोफत तपासणी करणार आहेत. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट,एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे.

डॉ. नरेंद्र वैद्य परिचय
डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल प्रा.ली. चे ते कार्यकारी संचालक आहेत.जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.12000 हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया,3000 रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि  70000 हुन अन्य शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका,जर्मनी आणि स्वीडन येथे  प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर  भारतात प्रथम आणुन त्यांनी 5000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. वैद्य यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी संपादन केली.नंतर ऑर्थोपीडिक्समध्ये उच्च शिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळवले.50 हुन अधिक त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.देश विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत.




No comments:

Post a Comment