चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या आठव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवक पदासाठी विक्रमी 49 अर्ज दाखल झाले आहेत. प्राची दयानंद काणेकर यांचे नगराध्यक्षपदासाठी दोन तर पुनम विजय कडुकर, शारदा संजय काणेकर, स्वरा सचिन बल्लाळ यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. आज दिवसभरात चार व्यक्तींनी नगराध्यक्षपदासाठी पाच तर आतापर्यंत सहा अर्ज दाखल केले आहेत. आज दिवसभरात नगरसेवक पदासाठी 35 उमेदवारांनी 49 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नगरसेवक पदासाठी आजचे 49 व आतापर्यंतचे 38 असे एकूण 87 अर्ज दाखल झाल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली. उद्या गुरुवारी (ता. 12) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्याला व पक्षाचा एबी फॉर्म जमा करण्यासाठी चढाओढ लागणार आहे.
आज 11 डिसेंबर 2019 रोजी नगरसेवक पदासाठी आलेले अर्जवार्ड क्रमांक एक – अजय अशोक कदम (दोन), अरुण तुकाराम हळदणकर (एक), प्रदिप लक्ष्मण कडते (एक).
वार्ड क्रमांक दोन – विजय शांताराम पाटील (दोन), जावेद लालासाहेब नाईक (तीन), प्रकाश सतुराम पाटील (एक), चेतन व्यंकटेश शेरेगार (एक), विक्रम कलाप्पा मुतगेकर (एक), दिलीप महादेव चंदगडकर (एक).
वार्ड क्रमांक तीन – आज एकही अर्ज दाखल नाही.
वार्ड क्रमांक चार – नुरजहा अब्दुलरहिम नाईकवाडी (दोन).
वार्ड क्रमांक पाच – इस्माईल इब्राहिम मदार (दोन), सिकंदर मुश्ताक नाईक (चार).
वार्ड क्रमांक सहा – इस्माईल महम्मद शहा (एक).
वार्ड क्रमांक सात – नेत्रदिपा प्रमोद कांबळे (एक).
वार्ड क्रमांक आठ – राजेंद्र गणपती परीट (एक), संतोष चंद्रकांत वणकुंद्रे (दोन).
वार्ड क्रमांक नऊ – जयश्री परशराम फाटक (एक), लक्ष्मी महादेव गायकवाड (एक).
वार्ड क्रमांक दहा – सरीता संतोष हळदणकर (एक), सोनिया संजय रजपूत (दोन).
वार्ड क्रमांक अकरा – गजानन धोंडीबा पिळणकर (एक).
वार्ड क्रमांक बारा – अब्दुलसत्तार अब्बास मुल्ला (दोन), गफार याकुब शेरखान (एक).
वार्ड क्रमांक तेरा – सुचिता संतोष कुंभार (एक), अलका अर्जुन कुंभार (दोन).
वार्ड क्रमांक चौदा – अरुण लक्ष्मण काणेकर (एक), सुनिल सुभाष काणेकर (एक), रोहित राजेंद्र वाटंगी (एक).
वार्ड क्रमांक पंधरा – यशोदा यशवंत डेळेकर (एक), उज्वला विश्वनाथ सुतार (एक).
वार्ड क्रमांक सोळा – अश्विनी बाळासाहेब देसाई (एक), संजीवनी संजय देसाई (एक), प्रमिला परशराम गावडे (एक).
वार्ड क्रमांक सतरा – संजना संदिप कोकरेकर (एक), माधुरी पांडुरंग पवार (एक).
No comments:
Post a Comment