शिवसंदेश ग्रुप व अभामसा परिषदेच्या वतीने महिपाळगडावर शिवचिंतन, वर्षाअखेरीला अनोखा उपक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2019

शिवसंदेश ग्रुप व अभामसा परिषदेच्या वतीने महिपाळगडावर शिवचिंतन, वर्षाअखेरीला अनोखा उपक्रमाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
महिपाळगड (ता. चंदगड) येथे बेळगांव येथील शिवसंदेश ग्रुप व अभामसा परिषदेच्या वतीने 31 डिसेंबर 2019 रोजी महिपाळगड येथे 'शिवचिंतन व शिवजागर' सायकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजन केले आहे. राजेश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ दरवर्षी ३१ डिसेंबरला 'रायगडवारी 'चे आयोजन करतात. त्याचप्रमाणे शिवसंदेश ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी महिपाळगड येथे शिवचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिपाळगडचे सरपंच प्रा. रमेश भोसले अध्यक्षस्थानी असतील. बेळगाव येथील   शिवसंत संजयजी मोरे, राजेंद्र मुतगेकर, रणजीत चौगुले, एन. वाय. बाळेकुंद्री यांचे व्याख्यान होणार आहे. बेळगाव येथील उद्योगपती महादेवराव चौगुले, उद्योगपती वैभव यादव, चैत कादंबरीकार द. तु. पाटील, कवी बसवंत शहापूरकर यांचा यावेळी सत्कार होणार आहे. तंटामुक्त अध्यक्ष हिरामणी तुपारे, पोलिस पाटील सौ. कोमल सावंत, मुख्याध्यापक सुनिल सावंत, अॅड. सुधीर चव्हाण, एम. वाय.घाडी, डी. बी. पाटील, एल. पी. पाटील, संदिप तरळे, एम. के. पाटील, संजय गुरव, मोहन अष्टेकर, संजय गौंडाडकर, गोपाळ चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त कमिटी सदस्य उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसंदेश ग्रुप व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन अभामसाप राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment