चंदगड नगरपंचायतीसाठी साडेअकरा वाजेपर्यंत 37.36 टक्के शांततेत मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी साडेअकरा वाजेपर्यंत 37.36 टक्के शांततेत मतदान

चंदगड नगरपंचायतीसाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांची वाट पाहत असलेले उमेदवार.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु आहे. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रावर गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट होता. सकाळी साडेनऊ वाजपर्यंत 16 टक्के मतदान झाले होते. 
सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 37.36 टक्के मतदान झाले. सकळपासून 1518 पुरुष व 1409 स्त्रिया असे एकूण 2927 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे साडेअकरा वाजेपर्यंत 7835 एकूण मतदारांपैकी केवळ 37.36 टक्के मतदान झाले होते. चंदगडच्या संभाजी चौकात पोलिस व्हॅनसह प्रत्येक मतदान केंद्रावर व केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार न घडता, सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. 
उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी नियंत्रण रेषेबाहेर थांबून आहेत. आलेल्या मतदाराला नमस्कार करुन त्याला मतदान करण्याची विनंती करत आहेत. उमेदवारांचे प्रतिनिधी मतदार यादीतून नाव शोधून देण्यासाठी मतदारांना मदत करत आहेत. चंदगड येथील कन्या व कुमार शाळेमध्ये 7, 8, 10, 11, 12, 13, 14 हि सर्वांधिक सात मतदान केंद्र एकाच ठिकाणी असल्याने मतदारांची या भागात नियंत्रण रेषेबाहेर गर्दी दिसत आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी जास्तीत-जास्त मतदारांना मतदानाला आणण्यासाठी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत असताना दिसत आहेत. बाहेरगावी असलेल्या मतदार कुठपर्यंत आले आहेत. याचाही अंदाज घेतला जात आहे. 


मतदानाची आकडेवारी
स. 7.30 ते 9.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
61
12.66
2
67
15
3
48
12
4
59
18
5
123
21
6
82
15
7
56
13
8
42
10
9
67
17
10
60
12
11
60
18
12
132
22
13
68
18
14
81
16
15
71
14
16
96
19
17
71
15
एकूण मतदानाची टक्केवारी 16 %

मतदानाची आकडेवारी
स.7.30 ते 11.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
165
34.23
2
154
34.68
3
119
29.17
4
119
35.95
5
239
41.57
6
182
33.15
7
143
34.46
8
118
27.06
9
135
34.26
10
144
28.80
11
150
44.12
12
285
47.58
13
184
49.46
14
203
40.68
15
209
40.35
16
221
43.33
17
157
33.91
एकूण मतदानाची टक्केवारी 37.36 %

No comments:

Post a Comment