चंदगड नगरपंचायतीसाठी 81.49 टक्के शांततेत मतदान, सोमवारी होणार मतमोजणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी 81.49 टक्के शांततेत मतदान, सोमवारी होणार मतमोजणी

नगराध्यक्षासह नगरसेवकांचे भवितव्य मशीनमध्ये बंद
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड नगरपंचायतीसाठी आज सकाळपासून शांततेत 81.49 टक्के मतदान आहे. नगराध्यक्ष पदाच्या एक जागेसाठी चार व नगरसेवक पदाच्या सतरा प्रभागातील 59 उमेदवारांचे भवितव्य आज मशीनमध्ये बंद झाले. आज मतदानाच्या दिवशी एकूण 7835 मतदारापैकी 3294 पुरुष तर 3091 स्त्रिया असे 6385 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या सोमवारी (ता. 30) तहसिल कार्यालयातील नूतन इमारतीमध्ये दहा वाजल्यापासून नऊ टेबलवर मतमोजणीला सुरवात होणार असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिली.
चंदगड नगरपंचायतीच्या मतदानासाठी सकाळीच्या सत्रात रांगा पहायला मिळाल्या.

सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. मात्र दुपारनंतर धिमा प्रतिसाद होता. दुपारी दोनपर्यंत साठ टक्केहून अधिक मतदान झाले होते. उमेदवारांचे प्रतिनिधी मतदार यादीतून नाव शोधून देण्यासाठी मतदारांना मदत करत होते. चंदगड येथील कन्या व कुमार शाळेमध्ये 7, 8, 10, 11, 12, 13, 14 सर्वांधिक सात मतदान केंद्र एकाच ठिकाणी असल्याने मतदारांची या भागात गर्दी दिसत आहे.
मतदान केंद्राच्या नियंत्रण रेषेबाहेर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदारांच्या प्रतिक्षेत थांबून होते.
उमेदवारांचे प्रतिनिधी मतदारांना मतदानाला आणण्यासाठी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी खास गाड्या करुन नियोजन केले होते. शेवटच्या टप्यात उमेदवारांचे प्रतिनिधी प्रत्येक प्रभागामध्ये जावून मतदान न केलेल्या मतदारांना घरी जावून मतदानाला लवकर जाण्याची विनंती करत होते.
नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये  पक्षाचे व अपक्ष उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर एकत्रित फोटो काढून आम्ही सर्व एकच असल्याचा संदेश दिला.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वांधिक दहा उमेदवार असल्याने एकेका मतासाठी येथे रस्सीखेच पहायला मिळाली. असे चित्र अन्य काही प्रभागामध्ये पहायला मिळाले. मतदानामुळे चंदगड शहरातील सर्व दुकाने बंद होती. पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंदगड शहराच्या संभाजी चौकात पोलिस व्हॅनसह प्रत्येक मतदान केंद्रावर व केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठेही अनुचित प्रकार न घडता, सर्वत्र शांततेत मतदान आहे. 

                                                  मतदानाची आकडेवारी
 सकाळी साडेसात ते साडेनऊ 15.88 टक्के, साडेअकरा अखेर 37.36 टक्के, दिडवाजेपर्यंत 59.45 टक्के, साडेतीन वाजेपर्यंत 73.63 टक्के, साडेपाच वाजेपर्यंत 81.49 टक्के मतदान झाले.

                                               बससेवा बंदमुळे मतदारांची गैरसोय
सीमाभागाचा वाद उफाळल्याने आज चंदगड-बेळगाव बसेस शिनोळीपर्यंत जात होत्या. चंदगड-कोल्हापूर बसेस कालमधून हमिदवाडा, कापशी, माद्याळमार्गे गडहिंग्लजवरुन चंदगड सुरु आहेत. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या मतदारांची मोठी अडचण झाली. त्यामुळे उमेदवारांनी खास वाहने करुन मतदारांना आणण्याचे नियोजन केले होते.
                                              पावसाचा काहीसा व्यत्यय
सायंकाळच्या वेळी पाच वाजण्याच्या सुमारास पंधरा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने काहीवेळ मतदारांची गैरसोय झाली. नियंत्रण रेषेबाहेर थांबलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतदार यांची काही वेळ तारांबळ उडाली.

प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी –
प्रभाग क्र. 1 – 79.67 टक्के
प्रभाग क्र. 2 – 81.08 टक्के
प्रभाग क्र. 3 – 79.17 टक्के
प्रभाग क्र. 4 – 78.25 टक्के
प्रभाग क्र. 5 – 83.03 टक्के
प्रभाग क्र. 6 – 86.52 टक्के
प्रभाग क्र. 7 – 80.00 टक्के
प्रभाग क्र. 8 – 72.71 टक्के
प्रभाग क्र. 9 – 84.77 टक्के
प्रभाग क्र. 10 – 79.06 टक्के
प्रभाग क्र. 11 – 80.59 टक्के
प्रभाग क्र. 12 – 82.08 टक्के
प्रभाग क्र. 13 – 87.09 टक्के
प्रभाग क्र. 14 – 83.37 टक्के
प्रभाग क्र. 15 – 81.66 टक्के
प्रभाग क्र. 16 – 84.09 टक्के
प्रभाग क्र. 17 – 76.67 टक्के
एकूण – 81.49 टक्के

7.30 ते 5.30 या दरम्यानची प्रत्येक दोन तासांची आकडेवारी
मतदानाची आकडेवारी
स. 7.30 ते 9.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
61
12.66
2
67
15
3
48
12
4
59
18
5
123
21
6
82
15
7
56
13
8
42
10
9
67
17
10
60
12
11
60
18
12
132
22
13
68
18
14
81
16
15
71
14
16
96
19
17
71
15
एकूण मतदानाची टक्केवारी 16 %
मतदानाची आकडेवारी
स.7.30 ते 11.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
165
34.23
2
154
34.68
3
119
29.17
4
119
35.95
5
239
41.57
6
182
33.15
7
143
34.46
8
118
27.06
9
135
34.26
10
144
28.80
11
150
44.12
12
285
47.58
13
184
49.46
14
203
40.68
15
209
40.35
16
221
43.33
17
157
33.91
एकूण मतदानाची टक्केवारी 37.36 %





मतदानाची आकडेवारी
7.30 ते 1.30  पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
298
61.83
2
266
59.91
3
211
51.72
4
167
50.45
5
396
68.87
6
321
58.47
7
227
54.70
8
215
49.31
9
261
66.24
10
259
51.80
11
216
63.53
12
361
60.27
13
282
75.81
14
294
58.92
15
318
61.39
16
297
58.24
17
269
58.10
एकूण मतदानाची टक्केवारी 59.45 %
मतदानाची आकडेवारी
स. 7.30 ते 3.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
350
72.61
2
325
73.20
3
296
72.55
4
217
65.56
5
464
80.70
6
425
77.41
7
289
69.64
8
290
66.51
9
318
80.71
10
332
66.40
11
259
76.18
12
453
75.63
13
306
82.26
14
343
68.74
15
389
75.10
16
388
76.08
17
325
70.19
एकूण मतदानाची टक्केवारी  73.63 %


मतदानाची आकडेवारी
स.7.30 ते 5.30 पर्यंत
प्रभाक क्र.
झालेले मतदान
टक्केवारी
1
384
79.67
2
360
81.08
3
323
79.17
4
259
78.25
5
479
83.3
6
475
86.52
7
332
80.00
8
317
72.71
9
334
84.77
10
398
79.6
11
274
80.59
12
496
82.8
13
327
87.9
14
416
83.37
15
423
81.66
16
433
84.9
17
355
76.67
एकूण मतदानाची टक्केवारी 81.49 %



No comments:

Post a Comment