चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहराच्या पहिल्या नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता झाली. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 4 उमेदवार तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी 59 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. रविवारी 29 डिसेंबर 2019 रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. 30 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिली.
चंदगड नगरपंचायतीसाठी एकूण मतदान 7835 असून यामध्ये 3981 पुरुष तर 3954 स्त्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सतरा मतदान केंद्रावर प्रत्येकी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई व कॉस्टेबल यांची नियुक्ती केली आहे. रविवारी सकळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होईल. सोमवारी सकाळी दहा वाजता चंदगड नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नऊ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दुपारी बारापर्यंत निकाल हाती येईल. प्रभाग क्रमांक चार, सात, अकरा, तेरा व सोळामध्ये प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात असल्याने दुरंगी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक एक, तीन, आठ, दहा, बारा, चौदा, पंधरा व सतरामध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक सहा व नऊमध्ये चौरंगी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वांधिक दहा उमेदवार रिंगणात आहेत. चंदगड नगरपंचायतीचा पहिल्या नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी प्रत्येकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्यासाठी गेले आठ दिवस पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. मात्र मतदार राजा कोणला कौल देणार हे पाहण्यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment