चंदगड तालुक्याअंतर्गत स्मार्ट ग्राम स्पर्धेत धुमडेवाडी ग्रामपंचायतीचा झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2020

चंदगड तालुक्याअंतर्गत स्मार्ट ग्राम स्पर्धेत धुमडेवाडी ग्रामपंचायतीचा झेंडा

चंदगड तालुक्याअंतर्गत स्मार्ट ग्राम स्पर्धेत धुमडेवाडी ग्रामपंचायतीची निवड झाली. त्यावेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याअंतर्गत स्मार्ट ग्राम स्पर्धेत धुमडेवाडी ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. दहा लाख रूपये व पुरस्काराने ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. धुमडेवाडी  ग्रामपंचायतीने १००% कर वसुली, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, स्वछतेबाबत विशेष कामगिरी करत १०० गुणा पैकी ८५.५ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावुन  जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली असून तालुक्यात सर्वत्र कौतूक होतं आहे. या साठी गावातील ग्रामस्थासह ग्रामपंचायतीने विशेष मेहनत घेतली. 
२६ जानेवारी रोजी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी सभापती शांताराम पाटिल, पं. स. सदस्य दयानंद काणेकर यासह विविध क्षेत्रांतील  मान्यवरच्या उपस्थितीत पंचायत समितीमध्ये हा सोहळा पार पडला. या कामी तालुक्याचे माजी सभापती व गावचे सुपुत्र शांताराम सटूप्पा पाटील, सरपंच सौ. पार्वती पाटील, उपसरपंच युवराज पाटील,  सदस्य  जोतिबा पाटील, सुमन पाटील, अनिता पाटील, ग्रामसेविका विद्या गोपिनाथ भोस, आय. सी. पाटील, एस भोगन मोहन धनाजी पाटिल, विठ्ठल पाटिल, ग्रामसेवीका गावित यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर माजी सभापती बबनराव देसाई, माजी उपसभापती विठाबाई मुरकुटे, सभापती अॅड. अंनत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणगेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, विस्तार अधिकारी आंळदे, एस. एम.  ठोबरे, बी. एम. कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment