![]() |
अनिल गवस |
कार्वे / प्रतिनिधी
दुसऱ्या चंदगडी नाट्य महोत्सवाला आजपासून हलकर्णी फाट्यानजीक असलेल्या विवेक इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणावर सुरुवात होत आहे. या नाट्य महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक अनिल गवस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर पहिल्या नाटकाच्या प्रयोगाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
साई कलामंच कुडाळच्या "तुझ्यात जीव रंगला" या नाटकाने या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणारे स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेले हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारलेले अनील गवस चंदगडी नाट्य महोत्सवात येत असल्याने त्यांच्या चाहत्यांची व नाट्य रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अनिल गवस हे १९७७ पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. "वस्त्रहरण," "रणांगण" यासारख्या गाजलेल्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेली भूमिका अजरामर ठरली आहे. कित्येक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ६० पेक्षा जास्त दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिकासह हिंदी मालिकांमधूनही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत."कोल्हाट्याच पोर," "अग बाई, अरेच्या"! या सारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका अजरामर केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी व स्वामींनी या मालिकांमधील भूमिकांनी ते घराघरात पोहोचले आहेत. ते या चंदगडी नाट्य महोत्सवात उपस्थित राहून नाट्य महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते व नाट्यरसिकांना मधून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या नाट्य महोत्सवास चंदगड तालुक्यातील नाट्य रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन या नाट्य महोत्सवाचे संयोजक परसू गावडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment