महिपाळगड शाळा जिल्हास्तरीय समुहगीत स्पर्धेत प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2020

महिपाळगड शाळा जिल्हास्तरीय समुहगीत स्पर्धेत प्रथम

महिपाळगड (ता. चंदगड) येथील जिल्हास्तरीय समुहगीत स्पर्धेतील यशस्वी प्राथमिक शाळेेचे  विद्यार्थी. 
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत महिपाळगड (ता. चंदगड) येथील कुमार प्राथमिक शाळेने वरिष्ट गट समुहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक व कनिष्ट गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शिक्षण व अर्थ सभापती प्रविण यादव, उपशिक्षणाधिकारी श्री. कासार यांच्या उपस्थितीत मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. मुख्याध्यापक प्रकाश बोकडे, शिवाजी रामनकट्टी, रामलिंग तुपारे, व्ही. एन. पेडणेकर, राजेश काटकर, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, केंद्रप्रमुख के. आय. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 


No comments:

Post a Comment