![]() |
भरत कुंडल |
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याना व्यवस्थापनाने भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि महापुरात झालेलं नुकसान लक्षात घेवून 11 फेब्रुवारी पासून पुढे येणाऱ्या उसाला जादाचा ऊस दर देण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रूवारी या दरम्यात येणाऱ्या उसाला प्रतिटन 2900 रुपये तर 1 मार्च पासून पुढे येणाऱ्या उसाला प्रति टन रुपये 2920 दर जाहीर केल्याचे ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले. त्याच बरोबर प्रत्येक महिन्याला वसंत दादा शुगर इन्स्टिटयूट पुणे येथील तज्ञामार्फत शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन मार्गदर्शन केले जाते. उशिरा येणाऱ्या उसाला अनुदान जाहीर करून ओलम कारखान्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हित जपले आहे. महापुरात झालेलं नुकसान आणि उत्पादनात झालेलं नुकसान लक्षात घेता हा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे ओलम व्यवस्थपनाने सांगितले.
No comments:
Post a Comment