म्हाळेवाडी येथे २५ ला गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2020

म्हाळेवाडी येथे २५ ला गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन


कालकुंद्री / प्रतिनिधी
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील सौरभ पाटील ट्रस्ट आणि दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई,शाखा चंदगड व बेळगाव यांच्यावतीने महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. म्हाळेवाडी  येथे २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात महाराष्ट्र सह इतर विविध ठिकाणचे गडकिल्ले छायाचित्रांसह  प्रतिष्ठानच्या गडसंवर्धन कार्याची माहिती चित्ररुपात मांडली जाणार आहे.  याच दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून सौरभ पाटील ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा स्पर्धा होणार आहेत. चंदगड, बेळगाव, गडहिंग्लज, आजरा परीसरातील विद्यार्थी,शिक्षक,पालक, इतिहास व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान चे चंदगड कार्यवाहक अजित पाटील व सदस्यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment