महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचा" वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार" चंदगड तालुका पत्रकार संघाला जाहीर, ८ फेब्रुवारीला अक्कलकोट येथे पुरस्काराचे वितरण
चंदगड / प्रतिनिधी
मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या आणि राज्यातील 354 तालुक्यात शाखा विस्तार असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येतो. राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या मेळाव्यात दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होतो. यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळावा सोलापूर जिल्हयात अक्कलकोट येथे 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी 2019 च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा केली आहे.
चंदगड तालुका संघानं पत्रकारांचे मजबुत संघटन उभारण्याबरोबर सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषदेने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ यांच्या नावाने राज्याच्या प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे आठ तालुक्यांची निवड करुन त्यांना सन्मानित करण्यात येते. पत्रकार संघटन, परिषदेच्या उपक्रमातील सहभाग, सामाजिक कार्य आदि गोष्टींचा निवड करताना विचार केला जातो. त्यामुळे कोल्हापूर विभागात चंदगड तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात आली.
चंदगड तालूका पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा
चंदगड तालुका पत्रकार संघाची स्थापन 20 एप्रिल 1994 साली करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला पत्रकार संघ म्हणून नोंद आहे. संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले. त्यापैकी जिल्ह्यात पहिल्यांदा तालुका स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना गणराया ॲवार्डसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक माधवराव सानप यांच्या उपस्थितीत विजेत्या मंडळाना ॲवार्ड देण्यात आले. श्री. सानप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम पुढे चंदगड तालुक्यात काही काळ राबविण्यात आला होता. सध्या संघाच्या वतीने चंदगड लाईव्ह (C L news) या पोर्टल चॅनलची सुरुवात २० नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आली आहे. अल्पावधीतच या चॅनलला मोठा प्रतिसाद मिळाला आहे सध्या सुमारे आठ हजार सबस्क्रायबर व तीन लाखाहून अधिक वाचक आहेत. भारतासह नऊ विदेशातील नऊ देशातील भारतीयांना चंदगडसह जिल्हा व राज्यातील घडामोडींंची माहिती क्षणार्धात मिळत आहे. त्यामुळे हे पोर्टल चॅनेल अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. 23 वर्षापूर्वी पत्रकार संघामार्फत पहिली अंगणवाडी व पतसंस्था सुरू करण्याचे धाडस केले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे हे दोन्हीही उपक्रम दोन वर्षांनंतर नाईलाजास्तव बंद करावे लागले. जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूरात चंदगड लाईव्ह न्यूज पोर्टलने तालूक्यातील पूरस्थितीच्या केलेल्या कव्हरेजमूळे देश-विदेशातील नागरिकांना तालुक्यातील पुरस्थिती समजत होती. देशसेवा करताना शहीद झालेल्या उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील जवान यांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ तर तीन लाख वाचकांनी बघितला आहे. दरवर्षी पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन एका माजी सैनिकांच्रा हस्ते करण्यात येते. पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार ढेरे हे गेली दहा वर्षे 25 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व वह्याचे वाटप करतात.
चंदगड तालुका पत्रकार संघाने शिरगाव (ता. चंदगड) या गावात व्यसनमुक्ती चळवळ सुरू केली. या गावातील सरपंच व काही महत्त्वाच्या व्यक्तींना सोबत घेवुन चळवळीचे महत्त्व सांगितले. त्यामुळे गावातील खासकरून महिलांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. या गावातून व्यसनमुक्ती चळवळीचा प्रांरभ झाला.
संघाच्या वतीने समाजातील विविध सामाजिक कामात सहभाग नोदवला जातोय. अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार समुपदेशनानंतर जोडायचे काम केले आहे. भाऊबंदकीतील वाद मिटविण्यासाठीही संघाच्या वतीने प्रयत्न केले आहेत. समाजातील गोरगरीब, वंचित घटकांसाठी संघाच्यावतीने नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. विधवा, परित्यक्ता, अपंग बांधव आदीना शासकीय योजना, नवीन रेशनकार्ड मिळवुन देण्यासाठी संघाचे सदस्य सेवाभावीवृतीने कार्य करतात. समाजातील एका आधुनिक बहीणाबाईचा शोध घेऊन तिच्यातील साहित्यिक समाजासमोर आणण्याचे काम ही संघामार्फत झाले आहे. लवकरच या अल्पशिक्षीत बहिणाबाईच्या "जनजागृती"या काव्य संग्रहाचे प्रकाशन पत्रकार संघामार्फत करण्यात येत आहे.
२० एप्रिल १९९४ साली संस्थापक अनिल धुपदाळे व उदयकुमार देशपांडे यांच्या पुढाकराने या पत्रकार संघाची स्थापना झाली. सामाजिक परिवर्तनाचा वसा घेऊन कार्य करणाऱ्या या संघाच्या कार्यात बाधा आणण्याचे काम काही मंडळीनी केले. मात्र त्यावरही मात करून संघाचे कार्य प्रसंगी पदरमोड करून सुरूच आहे. नंदकुमार ढेरे, श्रीकांत पाटील, संपत पाटील, अशोक पाटील, चेतन शेरेगार, राजेंद्र शिवनगेकर, रवी मोहीते, संजय पाटील, संजय केदारी पाटील, निवृत्ती हारकारे, युवराज पाटील, लक्ष्मण आढाव, संदिप तारिहाळकर, संतोष भोसले, रवळनाथ भादूंर्गी, तातोबा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश ऐनापूरे, महेश बसापूरे, संतोष सूतार, विजय कांबळे, बाबासाहेब मुल्ला, शहानूर मुल्ला आदी सदस्य संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे व अनिल धुपदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. अन्यायाविरोधात सतत प्रामाणिकपणे आवाज उठवून सामाजिक बांधिलकीने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता गेली पंचवीस वर्षे झटणाऱ्या चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कामाची देशातील नामवंत मराठी पत्रकार परिषदेकडून दखल घेतली गेली. या कार्याच्या जोरावर पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ म्हणून निवड होणे म्हणजे तालुक्याचा गौरवच आहे. या पुरस्कारांचे वितरण 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते होत आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि परिषदेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका संघाचे एस. एम. देशमुख, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील सर्व तालुका संघांचे पदाधिकारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment