संभाजी ब्रिगेडच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी सुशांत नौकुडकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2020

संभाजी ब्रिगेडच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी सुशांत नौकुडकर यांची निवड

सुशांत संजय नौकुडकर
माणगाव / प्रतिनिधी
माणगाव, ता. चंदगड येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सुशांत संजय नौकुडकर यांची संभाजी ब्रिगेडच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी निवड नुकतीच निवड झाली. निवडीचे पत्र शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात देण्यात आले.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संभाजी ब्रिगेड चंदगड तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना सुशांत नौकुडकर, सोबत आजोबा के. बी. नौकुडकर, आई सौ. मंगल नौकुडकर आदी.
मराठा सेवा संघाच्या वतीने  दिल्या जाणाऱ्या 'राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' वितरण कार्यक्रम प्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने,  वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रा. भास्कर निर्मळे, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, संगीत सुर्य केशवराव भोसले कला परिषदेच्या अध्यक्षा वर्षाताई धोबे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री रुपेश पाटील, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघाच्या बत्तीस विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना सुशांत नौकुडकर यांनी चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी तसेच वाचनातून समाज उन्नतीसाठी समर्थ ठरणारी मराठा बहुजन समाजातील तरुण पिढी घडविण्याच्या मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड वैचारिक चळवळीचा वारसा व कार्यास बळकटी देण्याचे कार्य थोरांच्या मार्गदर्शनातून करणार असल्याचे सांगितले.



No comments:

Post a Comment