![]() |
पुंडलिक गावडे (मयत) |
![]() |
भिमाना गुरव (जखमी) |
चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव-वेगुर्ला मार्गावर तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) येथील पेट्रोल पंपाजवळ मेसकाठ्या भरलेल्या टॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. पुंडलिक गोपाळ गावडे (वय-35, रा. सुळये) असे मयत चालकाचे नाव आहे तर भिमाना कृष्णा गुरव (वय-40, रा. सुळये, ता. चंदगड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. बाळु रामु गावडे यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – सुळये (ता. चंदगड) येथील पुंडलिक गावडे व भिमाना गुरव हे दोघे चंदगडच्या दिशेने आपल्या मोटरसायकलवरुन (एम. एच. ०९, ८९५७) बेळगाव-वेगुर्ला मार्गावरुन येत होते. याचवेली तुर्केवाडी फाट्याच्या पेट्रोल पंपासमोर मेसकाठी भरलेला ट्रॅक्टर (एम. एच. ४०, ए. एम. ११२८) अचानकपणे वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने ट्रॅक्टरला धडक दिली. यावेळी ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक पुंडलिक गोपाळ गावडे यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले भिमाना गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार सुरु आहेत. मयत पुंडलिक यांचे चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मतृदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
No comments:
Post a Comment