केंद्रशाळा कोवाड येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त पूजन करताना मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी. |
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी नेताजींचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान व महत्त्व विशद केले. यानिमित्त झालेल्या बाल सभेत अथर्वी जाधव, सुहानी भोगण, वेदांती सूर्यवंशी, सिद्धार्थ वांद्रे, श्लोक कुट्रे, मल्हार बुरुड, सिद्धार्थ मनवाडकर, सुफियान मुल्ला, रामदास महागावकर, प्रतीक्षा चांभार, अफिफा बाडकर, अनिरुद्ध हन्नुरकर, धनुष पाटील, रचना खोराटे, पिंटू भाटी आदी विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवन कार्याची महती सांगणारी भाषणे केली. याप्रसंगी अध्यापक गणपती लोहार, मधुमती गावस, भावना अतवाडकर, कविता पाटील, उज्वला नेसरकर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment