संग्रहित छायाचित्र |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालु हंगामापासून अथर्व शुगर्सने जिल्हा बँकेकडून चालवण्यासाठी घेतला आहे. यावर्षी अथर्व कंपनी पहिला गळीत हंगाम घेत आहे. या कारखान्याचा वजनकाटा शुक्रवारी अचानकपणे भरारी पथकाने तपासणी करून वजनकाट्या योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
अथर्वकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रात असे म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारच्या सत्रात वजनकाटा तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकाने कारखान्याचा वजनकाटा उसतोडणी, वाहातूकदार, शेतकरी आणि तपासणी पथकातील अधिकारी यांच्या उपस्थितीत तपासणी केली. यावेळी वजनकाट्यामध्ये कोणताही दोष नसून वजनकाटा योग्य असल्याचे तपासणी पथकाने सांगितले. या पथकामध्ये द्वीतीय विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था कोल्हापूरचे डी. एस. खांडेकर, निरिक्षक, वैद्यमापन शास्त्र चंदगडचे एम. डी. पाटील, जिल्हा सहाय्यक वैद्यनियंत्रक वैद्यमापन शास्त्र कोल्हापूरचे नरेंद्र मोहनसिंग, पोलिस ठाण्याचे डी. एन. पाटील यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment