दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि हलकर्णी फाटा येथील वेद इन्स्टयुट अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्यात संगणक कोर्सेस तसेच टॅली, एम एस ऑफीस, सी.सी.सी, एम. एस. सी. आय. टी. याला अनुसरून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीपुर्ण ज्ञान मिळावे यासाठी सामंजस करार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य पी. वाय. निबांळकर वेदचे संचालक अजित कडुकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. जी. जे. गावडे, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. एन. आर. हाजगोळकर आदि प्राध्यापक या सामंजस करारावेळी उपस्थित होते. या करारामुळे विद्यार्थी संगणक प्रणालीचा पुरेपुर फायदा होईल. प्रात्याक्षिके दाखवली जातील, व्याख्यान आदि गोष्टीचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. या सामंजस कराराबदद्ल प्राचार्य निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment