चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दाटे येथे कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2020

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दाटे येथे कार्यक्रमाचे आयोजन

आद्य पत्रकार बाळशात्री चांभेकर
चंदगड / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सहा जानेवारी रोजी कृषीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाटे (ता. चंदगड) येथे ६ जानेवारी २०२० रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृतपत्राची सुरुवात केली. तो दिवस पत्रकारांच्यासाठी "पत्रकार दिन"म्हणून साजरा केला जातो. चंदगड तालुका पत्रकार संघाचे हे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. त्यामुळे पत्रकार दिनाच्या निमित्ताने, यावेळी वर्षभरात विविध प्रकारचे नियोजन केले जाणार आहे.पत्रकार संघाच्या वतीने चंदगड लाईव्ह (सी. एल. न्युज) सुरु केले आहे. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. देशासह जगातील नऊ देशात राहणारे भारतीय लोक सद्या यांचे वाचक  आहेत. चंदगड तालुका पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद या सर्वात जुन्या (ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या) संस्थेबरोबर संलग्न राहून काम करत आहे. या परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मागील भेटीत समाधान व्यक्त केले होते. 


No comments:

Post a Comment