श्रीकांत पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्रीकांत वैजनाथ पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन कडून दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे दिनांक ५ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
श्रीकांत पाटील हे केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून एक उपक्रमशील, चतुरस्त्र, अष्टपैलू शिक्षक म्हणून सर्वपरिचित आहेत. विविध क्षेत्रातील संघटनांच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्या त्यांनी शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या उदात्त हेतूने केलेल्या आदर्श समाज सेवेची दखल यानिमित्ताने घेण्यात आली आहे.पुरस्काराचे वितरण थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment