महिपाळगड येथे शिवचिंतन व शिवजागर अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत, अभामसाप व शिवसंदेश ग्रुपतर्फे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2020

महिपाळगड येथे शिवचिंतन व शिवजागर अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत, अभामसाप व शिवसंदेश ग्रुपतर्फे आयोजन

महिपाळगड (ता. चंदगड) येथे शिवचिंतन व शिवजागर करुन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत झाले.
शिनोळी / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा आणि शिवसंदेश ग्रुप यांच्यावतीने नववर्षाचे स्वागत शिवचिंतन व शिवजागर करीत मान्यवरांची व्याख्याने व सत्कार असा अनोखा उपक्रम राबवून  महिपाळगड (ता. चंदगड) येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिपाळगड ग्रा.पं.अध्यक्ष प्रा. रमेश भोसले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते राजेंद्र मुतगेकर, रणजीत चौगुले, प्राचार्य एन.वाय.बाळेकुंद्री, संजय मोरे, मुख्याध्यापक सुनिल सावंत उपस्थित होते. 
 सायंकाळी 5 च्या दरम्यान सर्व सदस्यांनी सहकुटुंब येऊन महिपाळगडाची माहिती करून घेतली तसेच येथील वैजनाथ देवस्थानाचे दर्शन घेतले. यानंतर सायंकाळी महिपाळगड ग्रा.पं. च्या अंगणात शिवाजी महाराजांच्यावर विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी गावातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन अ‍ॅड. सुधीर चव्हाण, युवराज हुलजी , ईश्वर लगाडे व इतर मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर सचिन तरळे यांनी म्हटलेल्या ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका  विद्या पाटील यांनी सत्य शिवाहून सुंदर ही प्रार्थना म्हटली. एल. पी.पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. उद्योगपती लघुउद्योजक संघटनेच्या कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल महादेव चौगुले तसेच सदस्य म्हणून निवडून आलेल्या उद्योगपती वैभव यादव यांचा सत्कार अनुक्रमे सरपंच प्रा. रमेश भोसले व राजेंद्र मुतगेकर यांच्याहस्ते करण्यात आला. चैत कादंबरीला लोकमंगल पुरस्कार मिळाल्याबद्दल  द. तु. पाटील यांचा सत्कार अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. अनंत आंबोजी यांची व्यवसाय कर अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल डी.बी. पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  प्रा. रमेश भोसले, मुख्याध्यापक सुनिल सावंत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.  
यावेळी प्राचार्य एन.वाय.बाळेकुंद्री यांनी छ.शिवाजी महाराजांनी लहान वयापासून जी जिद्द बाळगून कर्तृत्व गाजविले त्याचा आढावा घेतला. सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा व सर्वांगीण कार्याचा आढावा घेतला. राजेंद्र मुतगेकर यांनी शिवाजी महाराजांचे नियोजन व दूरदृष्टीबद्दल उद्बोधक अशी माहिती सांगितली. शिवसंत संजय मोरे यांनी शिवसंदेश दिले. यावेळी सत्कारमूर्तींनीही आपले विचार मांडले. शेवटी प्रा. रमेश भोसले सर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले.  डी.बी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे सदस्य एम. वाय. घाडी, मोहन अष्टेकर, संजय गौंडाडकर, संजय गुरव, मोहन पाटील, गोपाळ चौगुले, महेश पाटील, अजित मोरे, मुख्याध्यापक शशिकांत सावंत,  प्रतिभा घाडी, वृषाली चौगुले , राधिका तरळे, संध्या गुरव, प्रभावती गीैंडाडकर, रोहिणी पाटील, सुषमा मोरे, अहिल्या मोरे उपस्थित होत्या.
                 'शिवसंदेश भारत 'चे मार्गदर्शक शिवसंत संजयजी मोरे यांनी दिले शिवसंदेश.
१. मराठ्यांची पाच तीर्थक्षेत्र आहेत (शिवतीर्थ)
 १.शिवनेरी २.राजगड ३. रायगड ४.तुळापूर ५ .पानिपत
या शिवतीर्थ ची यात्रा करणे, त्या भूमीच दर्शन करणे, त्या भूमीला वंदन करणे, प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य  असून हे कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मराठा धर्मात जन्माला आल्याचे सार्थक होणार नाही.

२ ) २१ वे शतक हे तंत्रज्ञान शतक असून या शतकाचा सर्वात मोठ हत्यार मोबाईल आहे.
 प्रत्येकाच्या हातामध्ये असून प्रत्येक कॉल रिसिव्ह करताना हॅलो,हाय म्हणण्यापेक्षा 'जय जिजाऊ ' म्हणावे व कालच्या शेवटला थँक्यू , बाय म्हणण्याऐवजी 'जय शिवराय ' म्हणावे.
जिजाऊंच्या नावाने सुरवात शिवरायांच्या नावाने शेवट
 केल्याने संपूर्ण संवादात अपशब्द येणार नाही .

३ ) शिवरायांनी... स्वराज्याच्या दौलत चढती केली. अर्थव्यवस्था प्रत्येक वर्षी बळकट केली त्याप्रमाणे प्रत्येक शिवभक्तांनी  प्रत्येक वर्षी आपली दौलत चढती  करावी.
४ स्वराज्य मधील सरदारांना शिवरायाने आदराने राव आणि जी नावाने संबोधले त्याप्रमाणे प्रत्येक शिवभक्ताने एकमेकाला आदराने राव किंवा जी लावून संबोधन करावे.

५)शिवचरित्र आत्मसात करून समाजाला शिवसंदेश देणे हे 'शिवसंदेश भारत ' या संघटनेचे कार्य असून प्रत्येक मावळ्याने शिवसंदेश देण्याचे व्रत धारण करावे.

No comments:

Post a Comment