सरसकट कर्जमाफीसाठी सेवा संस्था संघटनेच्या वतीने चंदगड येथे मेळाव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2020

सरसकट कर्जमाफीसाठी सेवा संस्था संघटनेच्या वतीने चंदगड येथे मेळाव्याचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मागणी अंतर्गत फक्त थकबाकीदार सभासदांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ फक्त थकबाकीदार सभासदांना मिळणार असल्याने चालू कर्जदार व नियमित परतफेड करणारे सभासद या योजनेपासून वंचित राहणार आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चंदगड तालुक्यातील विकास सेवा सोसायटी, सर्व चेअरमन, संचालक मंडळ व सभासद यांचा मेळावा गुरुवारी 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता चंदगड कॉ ज रोडवरील सोयरीक मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे. या मेळाव्यामध्ये नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांनासुद्धा या कर्जमाफी अंतर्गत सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफी सरकारने जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी चंदगड तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या सर्व चेअरमन, संचालक मंडळ व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.


No comments:

Post a Comment