चंदगड ब्राम्हण गल्लीतील गंजलेले विद्युत खांब बदलण्याची नगरसेविका संजना कोकरेकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2020

चंदगड ब्राम्हण गल्लीतील गंजलेले विद्युत खांब बदलण्याची नगरसेविका संजना कोकरेकर यांची मागणी

चंदगड ब्राम्हण गल्लीतील गंजलेला खांब.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहरातील ब्राम्हण गल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी विद्युत खांब गंजलेल्या असून धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे ते कधीही कोसळून परिसरातील लोकांच्या जीवाला धोका संभवतो आहे. येथील नागरीकांची हे गंजलेले विद्युत खांब बदलावेत अशी मागणी आहे. विद्युत खांब खालच्या बाजूने गंजलेला असल्यामुळे केवळ आजुबाजुला असलेल्या दोन्ही खांबाच्यावर या खांबाचा भार असल्यामुळे हे खांब अजूनही टिकून आहे. यावर्षी आलेल्या महापुरात त्याची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ब्राम्हण गल्ली येथे स्थळपाहणी करुन गंजलेले विद्युत खांब त्वरीत बदलावेत अशी मागणी ब्राम्हण गल्ली प्रभाग क्रमाक सतराच्या नगरसेविका सौ. संजना संदिप कोकरेकर यांना विद्युत कंपनीकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी संदिप कोकरेकर यांच्यासह मारुती सुतार, सुनिल कुंदेकर, संतोष ओऊळकर, विनायक मुळीक आदी उपस्थित होते. No comments:

Post a Comment