पीएम किसान योजनेच्या त्रुटीबाबत ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा – तहसिलदार विनोद रणवरे - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2020

पीएम किसान योजनेच्या त्रुटीबाबत ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा – तहसिलदार विनोद रणवरे

चंदगड / प्रतिनिधी
पंधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अकरा हजार आठशे खातेदारांचे आधार कार्ड दुरुस्ती करण्याबाबत संबंधिक गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना याद्या देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तीन हप्ते देण्यात आले होते. पण काही शेतकऱ्यांच्या सातबारावर वेगळे व बँक पासबुकवर वेगळे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत हि नावे सुधारली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एकही हप्ता जमा झाला नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे आॅनलाईन दाखवत नाहीत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पैसे काही कारणास्तव इतरांच्या खात्यावर गेले आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांच्यासाठी 10 ते 11 जानेवरी 2020 रोजी याद्या गावामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तसेच मोहिम स्वरुपात दुरुस्ती करण्यात येणार आहे. सदर यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्डव बँक पासबुक सोबत घेवून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. अन्यथा संबंधिक शेतकऱ्यांना यापुढील लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार विनोद रणवरे यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment