चंदगड येथील रवळनाथ देवाची मंगळवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2020

चंदगड येथील रवळनाथ देवाची मंगळवारी यात्रा


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ८४ खेड्याचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा मंगळवार दि ११ फेब्रुवारी ते रविवार दि १६ फेब्रुवारी अखेर होणार असल्याची माहिती खळनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव मधुकर देसाई यांनी दिला. 
चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ देवालयाच्या यात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होणार असून मंदिर परिसराबरोबर देवदेवतांच्या मूर्त्यांची स्वच्छता, यात्रोत्सव काळात लावण्यात येणारी दुकाने, पाळणे व भविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी रवळनाथ देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून मंगळवार दि .११ फेब्रुवारी रोजी गोंधळाचा कार्यक्रम, बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी रवळनाथ देवालयाची मुख्य यात्रा असून दुपारी मंदिरासभोवती हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती फिरणार आहे. गुरूवार दि. १३ रोजी चाळोबा देवालयाची यात्रा, शुक्रवार दि. १४ रोजी सातेरी भावेश्वरी देवीची यात्रा, शनिवार दि. १५ रोजी विठ्ठलाई देवीची यात्रा तर रविवार दि. १६ रोजी यात्रोत्सवाचा - सांगता समारंभावेळी नवस बोलणे, नवस मागणे, नवस फेडणे, रात्री पालखी सबिना फिरून झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment