बसर्गेच्या भावेश्वरी देवीची शनिवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2020

बसर्गेच्या भावेश्वरी देवीची शनिवारी यात्रा


चंदगड / प्रतिनिधी 
बसर्गे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत भावेश्वरी देवीची यात्रा शनिवार ८ ते रविवार ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शनिवारी देवीचा गोंधळ व जागर होणार असून रविवारी ९ रोजी आरती,नवस मागणे,नवस फेडणे, ओटी भरणे असे कार्यक्रम व मुख्य यात्रा आहे. या यात्रेचा लाभ भाविकांनी घ्यावा,असे आवाहन भावेश्वरी देवी यात्रा कमिटीचे हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment