चंदगड / प्रतिनिधी
बागिलगे (ता.चंदगड) पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा ( शुक्रवार दिि. ७ फेब्रुवरी रोजी होणार असल्याची माहिती माजी सरपंच नरसू पाटील यांनी दिली. बागिलगे सह,डुक्करवाडी(रामपूर),धुमडेवाडी,तांबुळवाडी,मौजे जट्टेवाडी,मजरे जट्टेवाडी,गुडेवाडी,नरेवाडी या गावचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथ देवालयाची यात्रा शुक्रवारी होणार असून या देवालयाची ख्याती नवसाला पावणारे देव म्हणून आहे . शुक्रवारी पहाटेपासून श्री देव रवळनाथाची धार्मिक विधीने पूजा अर्चा झाल्यानंतर नवस मागणे,नवस फेडणे,ओटी भरणे आदी कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे .
No comments:
Post a Comment