गणेश फाटक यांनी हत्ती व गव्यांच्या प्रश्नाबाबत घेतली आमदार प्रकाश आबिटकरांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2020

गणेश फाटक यांनी हत्ती व गव्यांच्या प्रश्नाबाबत घेतली आमदार प्रकाश आबिटकरांची भेट

सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक यांनी हत्ती व गव्यांच्या प्रश्नाबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांची गेतली भेट.  
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात हत्ती, गवे व अन्य वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पाजवीला पुजले आहे. या प्राण्यांकडून रोज शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. मात्र त्या बदल्यात वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुजपुंजी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक यांनी आमदार प्रकाश आबीटकरांची प्रत्यक्ष भेट घेवून केली. यावेळी आमदार श्री. आबिटकर यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडून वन्य प्रांण्याच्याकडून होनाऱ्या नुकसाचीची सरकारी रक्कम वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
आज आमदार प्रकाश आबिटकर यांची गणेश फाटक (चंदगड) यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्याप्रमाणे चंदगड तालुक्यातील हत्तीपासुन होणाऱ्या पिकाच्या नुकसानीबाबत चर्चा केली. प्रामुख्याने जंगली गव्या-रेडयाकडून झालेल्या नुकसानीची व हत्तीकडून केलेल्या नुकसानीची रक्कम ही सारखी असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे. हत्तीकडून ज्या पिकाची नासधुस केली जाते, ते पिक शंभर टक्के नष्ट होते. त्यामुळे त्या पिकातुन काही मिळत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण विधानसभेत हा प्रश्न मांडून व ही बाब शासनाच्या निर्दशला आणून द्यावी. तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी विनंती गणेश फाटक यांनी केली. या वेळी आमदार श्री. आबीटकर यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडून वन्य प्राण्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीची शासनाची रकम वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.


No comments:

Post a Comment