हलकर्णी येथील रवळनाथ देवाची सोमवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2020

हलकर्णी येथील रवळनाथ देवाची सोमवारी यात्रा

हलकर्णी येथील रवळनाथ देवालय.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा सोमवार 17 फेब्रुवारी 2020 रोजी होत आहे. परिसरातील खेड्यापाड्यातील जागृत दैवत म्हणून भाविक तसेच माहेरवासीन स्त्रिया व नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे लोक वर्षातून एकदा येणाऱ्या यात्रेला आर्वजुन उपस्थित असतात. दुपारी आरतीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पालखी सोहळा व मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गावातील भाविकांच्या बरोबरच परिसरातील गावातील पै-पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.  रात्री दहा वाजता परसु गावडे दिग्दर्शित 'विच्छा माझी पुरी करा ' या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment