कोवाड / प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षा सन २०२० ची कोवाड (ता. चंदगड) येथील परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण झाल्याची माहिती पर्यवेक्षक एन. बी. हालबागोळ यांनी दिली.
श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज येथे बारावी बोर्ड परीक्षेचे ४७१ क्रमांकाचे केंद्र आहे. या केंद्रावर कोवाडसह परिसरातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयांचे ५५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तेवीस वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १८ फेब्रुवारी ते ११ मार्च या काळात १४ विषयांची परीक्षा होणार आहे. परीक्षेची वेळ दुपारी ११ ते २ पर्यंत ठेवण्यात आली आहे. कस्टडी क्रमांक २७ चे पर्यवेक्षक हलबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एस. डी. सावंत हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. बोर्डामार्फत पुरेशा पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आले आहे. प्राचार्य ए.एस. पाटील व त्यांचा स्टाफ तसेच कोवाड केंद्रप्रमुख वाय. आर. निटुरकर हे परीक्षा काळात कुठलीही त्रुटी राहू नये, सर्व सुविधा पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोवाड व चंदगड पोलिस स्टेशन मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी विद्यार्थी-पालक यांचेसह सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment