जीवन घडवण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही - ह. भ. प. विठ्ठल गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2020

जीवन घडवण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही - ह. भ. प. विठ्ठल गावडे

ह. भ. प. विठ्ठल गावडे
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र ही संतांची जननी असुन थोर संताची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसारच आपली वाटचाल सुरू असुन विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आध्यात्मा शिवाय आपल्याला पर्याय नसल्याचे प्रतिपादन ह. भ. प. विठठल गावडे यांनी केले. अलबादेवी (ता. चंदगड) येथे पारायण सोहळ्यात  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्जून डांगे होते. ह. भ. प. विठठल गावडे बोलताना म्हणाले, ``आपल्या पाल्यांना संस्कार देण्यात आपण कमी पडत असुन यातुन आपण वेळीच सावध झाले पाहिजे असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली`` यावेळी वसंत गोते, परशराम चौकुळकर, राजाराम पाडले, विश्वास पाटिल, अर्जुन डांगे, बाळू पाटील, मारुती डांगे, नामदेव नेवगे, श्रीकांत नेवगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment