कोवाड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
कालकुंद्री / प्रतिनिधी
![]() |
कोवाड महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभात बोलताना प्रा. किसनराव कुराडे सोबत मान्यवर. |
चंदगडच्या कर्यात भागातील बहुजन समाजासाठी काहीतरी करावे. या उद्देशाने झपाटलेल्या तरुणांनी १९५३ साली कालकुंद्री येथे माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच चंदगड भागातील बहुजन समाजाच्या प्रगतीची द्वारे खुली झाली असे प्रतिपादन शिवराज शिक्षण संस्था गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ ए. एस. जांभळे होते.
प्राचार्य एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. व्ही. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे स्वीकारताना विद्यार्थींनी. |
क्रीडा विभागाचे प्रा आर. टी. पाटील यांनी अहवाल वाचन तर व्ही. के. दळवी यांनी सांस्कृतिक व शैक्षणिक विभागाचे अहवाल वाचन केले. यावेळी श्री. कुराडे म्हणाले. ``विद्यार्थ्यांनी मोठेपणी भागातील समाजासाठी काम करायचे आहे, हे आताच ठरवावे. केवळ उच्च शिक्षण देऊन सगळ्यांनाच नोकरी मिळणार नाही. त्यामुळे नोकऱ्या निर्माण करायचे शिक्षण देऊया असे मत व्यक्त केले.`` यावेळी सी एल न्यूज चॅनलचे संपादक संपत पाटील, माजी सहा. पोलीस आयुक्त शिवाजीराव पाटील, प्रा. ए. टी. पाटील, ए. एस. जांभळे यांची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी- विद्यार्थिनी, आदर्श वाचक, क्रीडा, शैक्षणिक व कला क्षेत्रात चमकलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. पी. सी. पाटील,बी. के. पाटील, पी. आर. पाटील, शाहू फर्नांडिस, याकूब मुल्ला आदींसह सर्व संचालक, प्राध्यापक वर्ग, पालक व महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मोहन घोळसे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. आर. डी. कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment