समस्याच्या गर्तेत अडकला किल्ले पारगड, पर्यटनातून विकासाला वाव, शासनाचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2020

समस्याच्या गर्तेत अडकला किल्ले पारगड, पर्यटनातून विकासाला वाव, शासनाचे दुर्लक्ष

ऐतिहासिक पारगड किल्ला
नंदकुमार ढेरे, चंदगड
ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) हा अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला असून येथील समस्या सोडवण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे अशी येथील स्थानिक रहिवासाची मागणी आहे.पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा,दूरध्वनी सेवा,गडाभोवती भक्कम तटबंदी,गडावरील अंतर्गत रस्ते,गटारे,बससेवा, आदी मूलभूत सूविधापासून अद्याप ही पारगड वंचित आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पारगडचा विकास करण्यास मोठा वाव आहे. पण याकडेही शासनाने दूर्लक्ष केले आहे. तीन वर्षांपूर्वी पारगडवाशियाना विकासाची खोटी स्वप्ने दाखवत एका पक्षाच्या पदाधिकार्याने पारगड किल्ला दत्तक घेण्याचे नाटक केले.चार वर्षे झाली पण पारगडवर  एक बूट्टी मातीही पडली नाही.स्थानिक व उदरनिर्वाहासाठी मूंबई, पूणे,गोवा येथे वास्तव्यास असणार्या रहिवास्यानी आपले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी 25हून अधिक अंदोलने केली आहेत.अंदोलन, उपोषण केल्याशिवाय येथील रहिवास्याना काहीच मिळत नाही. आजही पारगड वाशीयाना आपल्या हक्कासाठी शासन दरबारी भांडावे लागत आहे.
पारगड हा शिवशाहीतील एक अवघड किल्ला . तानाजी मालुसरे,शेलार मामा यांच्या वंशजासह माळवे, डांगे, शिंदे,नांगरे,चव्हाण इत्यादी अनेक शूर घराण्यांनी या गडावर वास्तव्य केले व गड अजिंक्य ठेवला .अशी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना देखील या गडकरयांनी गड सोडला नाही . गोवामुक्तीची आस जपत फिरंग्यावर नजर ठेवली .पण सध्या प्रसारित झालेला तान्हाजी चित्रपट सूपरहिट ठरला आहे.तानाजी मालूसरेचे वंशंज सध्या पारगडावर आहेत.त्याना व पारगड किल्ला बघण्याच्या निमीत्ताने शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी काही प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे गडावर रहाणाऱ्या कुटुंबांना त्रास होण्याची शक्यता  आहे . पारगडाची मालकी वनखात्याकडे आहे.त्यामुळे  शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी वनरक्षक व पोलीस बंदोबस्त ठेवल्यास पर्यटकांच्या गैरवर्तनाला आळा बसेल, अशी मागणी पारगडवासियांतून केली जात आहे. पारगड ता चंदगड येथील ऐतिहासिक किल्ले पारगडवर आठ दिवसापूर्वी काही अतिउत्साही पर्यटकांनी केलेल्या हुल्लडबाजीची तक्रार पीएमओ कार्यालयाच्या वेबसाईटवर  केली होती.मया तक्रारींची  दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी घेतली. याबाबत कारवाई करण्याची सूचना महाराष्ट्र राज्याचे पर्यटन याना देण्यात आले, हे एक प्रकारे चांगलेच झाले मात्र पारगडवर वास्तव्यास असणार्या रहिवास्याना  सध्या काय सोयी सुविधा उपलब्ध आहेत किवा नाही याचीही चौकशी पर्यटन सचिवांनी करावी अशी अपेक्षा पारगड वाशीयानी केली आहे.

पारगड हा स्वराज्यातील अजिंक्य किल्ला.या गडावरच आजही मावळ्याची वस्तीआहे.त्यामुळे येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.अंदोलने, उपोषण केल्याशिवाय येथील रहिवास्याना काहीच मिळत नाही.आम्ही ही देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने पारगडचा विकास करून येथील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी 
रघुवीर खंडोजी शेलार(शेलार मामाचे वंशज), तंटामूक्त अध्यक्ष, पारगड

निसर्ग रम्य,गर्द झाडीत वसलेला पारगड हा किल्ला असून पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. पारगडवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे  याचा त्रास येथील नागरिकांना होणार आहे यासाठी गडावर वनविभागाने व पोलिस खात्याने संयुक्त बंदोबस्त नेमावा. प्रकाश चिरमूरे, किराणा दुकानदार,पारगड


No comments:

Post a Comment