![]() |
चंदगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने तालुका स्तरावरील दुसरे गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शनावेळी इतिहासप्रेमींनी केलेली गर्दी. |
मागील चौदा वर्षे महाराष्ट्र भर गडकिल्ले संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई शाखा चंदगड व बेळगाव मार्फत चंदगड येथे दुसरे चंदगड तालूका स्तरीय गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शन नुकतेच पार पडले. चंदगड येथील माजी आमदार कै. न. भू. पाटील प्रशालेतील अटल सभागृहात हे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. चंदगड तालूका समन्वयक अजित पाटील व अनिल केसरकर यांच्या संयोजनाखाली झालेल्या या प्रदर्शनाचा लाभ दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि परीसरातील शिवदुर्ग प्रेमींनी घेतला.
प्रतिष्ठान वतीने तालुक्यातील गडांवर चाललेल्या संवर्धन कामात सहभागी होण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सदस्यत्व घेतले. अध्यक्ष संतोष हासूरकर, अभिजित अष्टेकर, संदीप गावडे, समिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन कार्यक्रम झाला. वनखात्याचे वनपाल दयानंद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवर्जून दिलेल्या भेटीची चर्चा यावेळी होत होती. प्रदर्शनासाठी दुर्गवीर संभाजी सावंत, उमेश बिर्जे, ऋषीकेश सुतार, पुंडलिक भांबर, राजू सुतार यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment