चंदगड येथे आज जनजागृती काव्यसंग्रहाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2020

चंदगड येथे आज जनजागृती काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मुक्ताबाई नावळे (कवयित्री)
चंदगड / प्रतिनिधी
नागवे (ता. चंदगड) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आधुनिक बहिणाबाई सौ. मुक्ताबाई पांडुरंग नावळे यांच्या जनजागृती या संमिश्र काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजता संदिप सामंत यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात होणार आहे. 
पत्रकार संघाच्या सहकार्याने हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. यावेळी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव पाटील, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, पोलिस निरिक्षक अशोक सातपुते, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित जगताप, नायब तहसिलदार डी. एम. नांगरे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता संजय सासणे, चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील उपस्थित रहाणार आहेत. यावेळी प्रा. मायाप्पा पाटील व अखलाखभाई मुजावर यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नावळे परिवाराने केले आहे. 


No comments:

Post a Comment