कार्वे (ता. चंदगड) येथे विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष प्रा. नंदकुमार पाटील. |
महाराष्ट्र राज्य उच्चमाध्यमिक शाळा कृती समिती चंदगड तालुका कार्यकारिणीची बैठक कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाली. यावेळी अनुदानाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत येत्या 12 वी बोर्ड परीक्षेनंतर पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
अजूनही काही शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता मिळालेल्या नाहीत व चंदगडमधील काही तुकड्यांचे मुल्यांकन झालेले नाही. त्यासाठी संघटनेमार्फत पाठपुरावा कराण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रा. नंदकुमार पाटील म्हणाले, ``बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद या थोर व्यक्तीना संघटनेचे महत्व पटले होते. विवेकानंद यांनी आपापसातील मतभेद, हेवेदावे, द्वेष, कपट बाजूला ठेवून संघटित व्हा आणि समाजाबरोबर स्वत:चाही उत्कर्ष करून घ्या. मी आणि आपली संघटना शिक्षकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. संघटना बळकट करण्याची आपली सर्वांची जबबादारी असल्याचे सांगितले. प्रा. सुबराव पावले यांनी बैठकीचा हेतू व उद्देश प्रास्ताविकेतून स्पष्ट केला. संघटनेचे सचिव प्रा. शाहू गावडे यांनी `संघटनेचे कामकाज आदर्श पध्दतीने चालू आ.हे आमची संघटना प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष करत आहे.` तालुका संघटक प्रा. पुंडलिक दरेकर यांनी संघटनेचे महत्व व जबाबदारी यावर भाष्य केले. यावेळी उपाध्यक्ष प्रा. उदय बोकडे, प्रा. अंकुश नौकुडकर, प्रा. स्वप्नील बोकडे, संघटनेचे प्रा. जयवंत पाटील, प्रा. नाईक यांची भाषणे झाली. यावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रा. दत्तात्रय सुतार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment